भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ मध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाच्या एकवीस नगरसेवकांनी हाताला घड्याळ बांधले आहे यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसे यांनी जळगाव महापालिकेत एकूण 27 नगरसेवक कडून जोरदार धक्का दिला होता यामुळे भाजपमध्ये मोठे खिंडार पडले होते मनपाची सत्ता जाऊन शिवसेनेचा महापौर जळगाव मनपा मध्ये निवडून आला अगदी तोच पायंडा पडत खडसे यांनी भुसावळमध्ये देखील 21 नगरसेवकांचा प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करून घेतला आहे. राष्ट्रवादी मध्ये नव्याने प्रवेश केलेले नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे भाजप मधील खडसे समर्थक असून खडसे जातील किंवा आदेश देतील त्याच मार्गावर आम्ही पुढे काम करणार असल्याची प्रतिक्रिया देखील प्रवेश करणार या नगरसेवकांनी यावेळी दिली आहे.
आगामी काळात मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे ेणार्या वर्षात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून गळती लावत राष्ट्रवादी कम बॅक करीत असल्याचा प्रत्यय भाजपच्या 21 नगरसेवकांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यात आला आहे यामुळे भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात भाजपला कंबर कसून काम करावे लागणार आहे आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी आणखी मोठे प्रवेश घडवून आणू असे वक्तव्य खडसे यांनी केले आहे.