दुपारचे भांडण मिटल्या नंतरही टोळक्याने केली फिर्यादीना धमकी देत मारहाण
जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा :- दुपारच्या वेळेस हॉटेलवर झालेले भांडण परस्परां विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यानंतर समोपचाराने मिटल्यांनतर टोळक्याने परत फिर्यादीच्या घरी जात धमक्या देत मारहाण केल्याची घटना काल रात्री जामनेर पुरा भागातील विवेकानंद नगर परिसरात घडली.या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोलीस पोहचले असता.त्यांनी टोळक्यातील गुंडांना स्थळावरून पांगवत असतानां काहींनी पोलीस पथकावर दगडफेक करीत परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.यात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की फिर्यादी सुंनदा वाल्मिक लोहार यांच्या मुलाचे दुपारच्या वेळे दरम्यान एका हॉटेलवर काहीं सोबत वाद झाले.त्या वादानंतर दोन्ही बाजुंनी एकमेंकावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्यानंतर रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान टोळक्यातील दिपक कचरे,उल्हास नेमाडे सोबत इतर टोळक्यातील काहींनी फिर्यादी यांच्या घरावर लाकडी दांडे घेवुन चाल केली. फिर्यादी कुटुंबातील सद्यस्यांना धमक्या दिल्या तसेच महिलांना अश्लील शिवीगाळ देत मारहाण करण्याच्या बेतात असताना.दरम्यान याची माहिती पोलिसांनी मिळाल्यावर लागलीच पोलिसांचे पथक तिथे पोहचले.पोलीस टोळक्यातील गावगुंडाना आवर घालत परिसरातुन पागवंत असताना.टोळक्यातील काहींनी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचेवर दगडफेक करीत परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी टोळक्यातील म्होरक्या दिपक कचरे याला चांगलाच चोप दिला.यावेळी काही महिलांनी पोलिसांचे टाळ्या वाजवत या कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला.घटनेची जामनेर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन.फिर्यादी सुंनदा लोहार यांच्या फिर्यादीवरून दिपक कचरे,उल्हास नेमाडे यांच्यावर कलम २९४,३८६,३२४,४५२,३५४(अ),४२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस प्रशासन करत आहे.