भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्याती मिरगव्हाण येथील गट क्र.९६/१, ९६/२, ९६/३ या जमिनिचा अनधिकृत बिनशेती आदेश असतांना व्यापारी वापर केल्याने शर्तभंग करण्यात आली आहे. याबाबत येथील बियाणी परिवाला २६ लाख २९ हजार ४२ रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मात्र संबंधितांनी दंडाची रक्कम अद्यापर्पंत न भरल्याने त्यांच्या संबंधित मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश तहसीलदार दीपक धिवरे यांनी मिरगव्हाण तलाठी यांना दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट क्र, ९६/१, २, ३ या भुुखंडाची बिनशेती परवाणगी न घेता अनधिकृतरित्या वाणिज्य प्रयोजनार्थ करण्यात येत असल्याची तक्रार येथील माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती. याबाबत तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यानुसार कांताबाई बन्सीलाल बियाणी, मनोज बियाणी, विनोद बियाणी, ममता कलंत्री (सर्व बियाणी पब्लिक स्कुल संचालक) यांना १० ऑगस्ट रोजी नोटीस २६ लाख २९ हजार ०४२ रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. सदर रक्कम सात दिवसात भरणा करण्याचे नोटीसीत नमुद करण्यात आले होते. मात्र सदरची रक्कमेचा भरणा अद्यापपर्यंत झालेला नाही.
सदर रकमेचा भरणा करण्यात आला नसल्याबाबात माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी २७ सप्टेंबर २०२१ रोजी तहसीलदार यांना सदरच्या कारवाईत विलंब होत असल्याबाबत निवेदन सादर केले होते. त्यांतर संबंधितांना ११ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर रोजी दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दंडाच्या रक्कमेचा भरणा करण्यात आलेला नसल्याने तहसीलदार दीपक धिवरे यांनी दंडाची रक्कम मिळेपर्यंत मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश १६ डिसेंबर रोजी मिरगव्हाण तलाठी विनोद बारी यांना देण्यात आले आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणीचा दिनांक व त्याची कोणत्या पद्धतीने कारवाई केली ते किंवा कारवाई का करण्यात आली नाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.