पाळधी राजमुद्रा वृत्तसेवा |कर्नाटक राज्यात महाराष्ट्राचा सीमेलगत बंगळूर जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. हा घोर अपमान असून संपूर्ण हिंदुस्थानाची शरमेने मान खाली गेलेली आहे. हे कारस्थान कर्नाटक मुख्यमंत्री यांचे आहे. वरिष्ठ पातळीवर ही चौकशी होऊन त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावे. या घटनेचा पाळधी शिवसेना शाखेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. सदर घटनेबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल यामध्ये जे काही नुकसान होईल त्याला कर्नाटक सरकार जबाबदार धरले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
हे निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभापती मुकुंदराव शामराव नन्नवरे यांच्या नेतृत्वात पाळधी पोलीस दुरक्षेत्रचे अंमलदार यांच्याकडे देण्यात आले याप्रसंगी उपस्थित संजय पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, पाळधी बुद्रुक सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, अरुण पाटील माजी सरपंच, धर्मेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य, दानिश पठाण, समाधान वाघ, दीपक श्रीखंडे, अनिल पंडित, प्रशांत झंवर, राहुल ठाकूर, कृष्णा बर्वे, तुषार मोरे, भैया नन्नवरे, प्रसाद शिंदे,सादिक देशमुख, बंटी चौधरी
व शिवसैनिक