बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील दिग्गज नेते असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे,माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यात टिक्का-टिप्पणी चा जोरदार कलगीतुरा रंगला आहे. बोदवड नगरपंचायत दोघांनी प्रतिष्ठेची केल्याने दोघांनी विजयासाठी कंबर कसली आहे. गिरीश महाजन यांनी थेट खडसेंवर निशाणा साधला, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भक्कास आणि म्हणे मोठा नेता, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर केली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गिरीश महाजनं यांनी 15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळाले. आणि तरीही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा असा विरोधीक टोला देखील महाजनांनी एकनाथ खडसेंना हाणला आहे.
ज्या वेळेस एकनाथ खडसे समोरील प्रचारसभेत खडसे शेरोशायरी करत असल्याचे ऐकताच. त्यावर गिरिश महाजनांनी खडसेंवर टीकेची संधी साधली. शेरोशायरी करता स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात ते तुम्हाला लिहून देताना तुम्ही वाचतात. तुमचं हेच का आता की तुम्ही शेरो शायरी करावी. मात्र, आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.