चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना राजकीय मुद्दा बनवून कर्नाटक मधील बंगळुरू येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली.या सर्व बिनडोक झुंडीना आळा घालण्याचे काम कर्नाटकाच्या शासनाचे होते व पर्यायाने कर्नाटक मुख्यमंत्री यांचे होते.मात्र आपल्याच मस्तवाल पणात असलेल्या,सत्ता मिळाली म्हणजे महापुरुषांचे विचारांचा पालापाचोळा करणाऱ्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा ‘शुल्लक घटना, म्हणून उल्लेख केला.जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे समाजकंटक दोषी आहेत.तेवढेच किंवा त्याहूनही जास्त या घटनेला शुल्लक घटना म्हणून उल्लेख करणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबना करणाऱ्या समाज कटंकांच्या निषधार्थ शिवप्रेमी संघटनानी तहसिल कार्यालय समोर तीव्र आंदोलन करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दि २० रोजी निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे लोक कल्याणकारी व शोषित,वंचित,कष्टकरी समाज घटकाला सामावून घेणारे होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जातीच्या,धर्माच्या. प्रांताच्या भिंती कधीच ओलांडल्या गेल्या होत्या.मध्ययुगीन जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोककल्याणकारी विचार करणारे,स्त्रियांचे संरक्षण करणारे,शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका असे आदेश आपल्या सैन्याला देणारे एकमेव राजे होते.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना राजकीय मुद्दा बनवून कर्नाटक मधील बंगळुरू येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली.या सर्व बिनडोक झुंडीना आळा घालण्याचे काम कर्नाटकाच्या शासनाचे होते व पर्यायाने कर्नाटक मुख्यमंत्री यांचे होते.मात्र आपल्याच मस्तवाल पणात असलेल्या,सत्ता मिळाली म्हणजे महापुरुषांचे विचारांचा पालापाचोळा करणाऱ्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा ‘शुल्लक घटना, म्हणून उल्लेख केला.जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे समाजकंटक दोषी आहेत तेवढेच किंवा त्याहूनही जास्त या घटनेला शुल्लक घटना म्हणून उल्लेख करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सुद्धा दोषी आहेत.या सर्वांवर कार्यवाही व्हावी व त्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी अन्यथा आम्हा तमाम शिवप्रेमींच्या संयमाचा अंत होणार असल्याचे निवेदनाद्वारे रयत सेना,वीर भगतसिंग परीषद,मराठा सेवा संघ,प्रगत संस्थेच्या वतीने कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे.तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबना करणाऱ्या समाज कटंकांचा निषधार्थ शिवप्रेमी संघटनानी तहसिल कार्यालय समोर तीव्र आंदोलन करून तहसीलदार अमोल मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांना दि २० रोजी निवेदन देण्यात आले, आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वीर भगतसिंग परिषदेचे पंकज रणदिवे, मराठा सेवा संघाचे अरुण पाटील, प्रगत संस्थेचे खुशाल पाटील तर रयत सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुमित भोसले, जिल्हाध्यक्ष संजय कापसे,ज्ञानेश्वर कोल्हे,भाऊसाहेब पाटील, स्वप्निल गायकवाड, छोटू अहिरे , दीपक देशमुख ,प्रदीप मराठे ,प्रकाश पाटील, दिलीप पवार, भुषण पाटील, ज्ञानेश्वर सोनार, सुनिल पवार , विलास पाटील,हितेंद्र मगर, प्रशांत आजबे ,मुकुंद पवार, राकेश बोरसे ,दिनेश चव्हाण, भरत नवले ,विकास पवार, राजेंद्र पगार ,सागर गवळी, भैय्यासाहेब पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील ,सोनू देशमुख आदी उपस्थित हो
ते