जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगांव शहरातील साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणार्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यव्रुत्ती योजनेचा केंन्द्र व महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग यांचे दिनांक १ मार्च २०२१ चे शासन परिपत्रकाची तात्काळ अमलबजाणी करुन साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगाव महानगराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह,महापौर, जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी,महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
ह्या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे मा.महानगर जळगांव जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चांगरे, उपाध्यक्ष प्रविण माळी,सरचिटणीस चंद्रमणी सोनवणे, नंदकिशोर कंडारे,राष्ट्रवादी काँग्रेस फाऊंडर मेंबर फिरोज शेख, गौरव लंवगले,राकेश माळी,लखन सांगीले, यश चांगरे, आकाश घेघंट,हुसेन साबरी ,इम्रान सैय्यद पटवे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.