जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अवघ्या गुन्हेगारी जगाला दरदरून घाम फोडणाऱ्या जिल्हा पोलीस विभागाला ऐन थंडीतही थंडा घाम गाळायला लावणारा राज्याच्या गृहमंत्र्यांचा दौरा समोर न आलेल्या अनेक घटनांना उघड करण्यास प्रवुत्त व करणारा आहे. गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने दस्तुरखुद्द पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे हातात पावडा घेऊन आणण्यासाठी धडपड करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.झाले असे की, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरातील मुख्यालया च्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या पोलिसांच्या नवीन भव्य दिव्य निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी जळगाव शहरात आले होते. मंत्र्यांचा दौरा म्हटला म्हणजे बंदोबस्तासाठी पोलिसांची तारांबळ उडणार च यात काय नवे..असे आपल्याला वाटणे साहजिकच आहे..त्यात गृहमंत्री येत आहे म्हटल्यावर पोलिसांचा ताण आणखी वाढणारच…असेही आपण म्हणू शकतो.
पण, वरवर असे वाटणे आपण समजू शकतो.मात्र खरी गोम वेगळीच आहे. मंत्रांच्या दौऱ्याचे व्यवस्थित नियोजन नसेल तर कशी भागम भाग होते हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नियोजित कार्यक्रमा मुळे पोलीस दलाला उमगले असेलच..
गृहमंत्री पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात येईपर्यंत पोलिसांची कार्यक्रम पार पाडण्याची तयारी सुरूच होती. मैदानावर लाॅन्स (गवत) टाकण्याचे काम असो की मंच उभारणे असो… सर्व काही आलबेल.. एवढेच नाही आवारात गृहमंत्री वृक्षारोपण करतांना अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी कुतूहलाने याची डोळा याची देही हा प्रसंग डोळ्यात साठवत असताना पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे साहेब काही पोलिसयंत्रणेला सूचना करताना दिसत होते. पण..साहेबांच्या सूचना समजल्या नाहीत की काय..की आणखी काही कारणे असोत पोलीस अधिक्षकांना माती दाबण्याचा पावडा..वृक्ष रोपांसाठी लावलेल्या झाडाला पाणी देणारा जार स्वतः च्या हातात धरून उभे रहावे लागले. भयंकर नाही महा भयंकरच झाले.
हाता खाली जिल्ह्याची अख्खी पोलीस यंत्रणा असतांना पोलीस अधिक्षक साहेबांना राबतांना पाहून अवघे पोलीस दल धन्य झाले असेल. कोणतेही व्यवस्थित नियोजन नसले तरी गृहमंत्र्यांच्या कार्यक्रम चांगलाच पार पडला.साधे भोळे आमदारांचे थोडे फार रुसवे फुगवे झाले. मनधरणी झाली. आमचीही वेळ येईल असा इशाराही देऊन झाले. हे या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट ठरले.
पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात मुख्यालयात भव्य दिव्य व सर्व सुविधांनी युक्त असे पोलिसांच्या निवासस्थानांची इमारत निर्माण करण्यात आली आहे. या निवासस्थाने उद्घाटन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा ऐनवेळी ठरला असा भाबडा खुलासा समोर येऊ शकतो. पण त्यात तितकेसे तथ्य नाहीच नाही. कोणताही मोठा नेता अचानक धावती भेट जरी देत असेल तरी त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली जात नाही. मात्र, गृहमंत्री पोलीस निवासस्थान इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी येणार..त्यांची तारीख पक्की झाली असणार हे साधे सरळ वास्तव आहे.
पण या कार्यक्रमाचे नियोजन करताना झालेला गोंधळ..धावपळ.. पाहता कोणी मान्य करो की नको करो पण, बापरे बाप.. डोक्याला ताप.. असे पोलिस दलाला पक्के वाटले असणार..
पोलिसांचे नाव आले की भले भले गुन्हेगार टरकून जातात..चोराच्या मागे पोलिस असतात..मात्र गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नुसते धावपळ करणारे पोलिस कर्मचारी दिसून आले. गृहमंत्री पोलिस अधिक्षक कार्यालयात पोहचून गेले तो पर्यंत कामाची तयारीच सुरू…
मैदानावर लाॅन्स सुद्धा टाकण्यासाठी पुरेसे नियोजन नसेल तर…मंत्री पोहचून गेले असताना फरशी पुसण्याचे, साफ सफाईचे काम सुरूच..फसलेल्या नियोजनाचा चांगला कार्यक्रम म्हणून पोलिसांच्या नवीन निवासस्थान इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम असे वर्णन करणे उचित ठरेल.पण त्याही पेक्षा खुद्द पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे हातात माती दाबण्याचा पावडा आणि झाडाला पाणी देण्याचा जार उभे धरून धावपळ करत असतील तर… हेच खरे भयानक वास्तव लक्षात घेऊन पोलिसांना चिंतन करण्याची गरज आहे.