जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पोलीस मल्टीपर्पज हॉलचे नूतनीकरण करून ऍकॉस्टीक व सोलर पॉवर ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल च्या वतीने देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याचा जळगाव दौऱ्यात दि २०१२.२१ रोजी जळगांव राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेल च्या वतीने सौ कल्पनाताई पाटील ,उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ,श्री रमेश भोळे ,जेष्ठ नाट्यकर्मी व श्री गौरव लवंगळे ,जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक सेल यांची उपस्थिती होती.
पोलीस मल्टीपर्पज हॉल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.
हा हॉल ध्वनीदृष्टीने व प्रकाशाच्या दृष्टीने अद्ययावत केला तर तो विविध लाईव्ह कार्यक्रमास उपयुक्त होईल.
ज्याचा पोलीस कार्यक्रमास व शहरातील विविध सांस्कृतीक कार्यक्रमास उपयुक्त होईल.या मुळे स्थानिक सांस्कृतीक क्षेत्र बहरण्यास मदत होईल.
पोलीस मल्टी पर्पज हॉलच्या नूतनीकरण करण्याबाबतीत मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ तश्या सूचना पोलीस अधीक्षक याना दिल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. ह्या हॉलच्या संपूर्ण छतावर सोलर सिस्टीम लावली तर हॉलचा देखभाल खर्च शून्य होईल उत्पन्न देखील मिळेल. हेही निदर्शनास आणून दिले.