जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दरम्यान काल दिनांक २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र पाटील बोदवड येथे गेले असता.मुक्ताईनगर येथील छोटु भोई व समाधान महाजन या गुंड प्रव्रुत्तीच्या व्यक्तीने पाटील यांच्याशी अरेरावी करत आमच्या मतदारसंघात का आले असे म्हणत वाद घातला.याचा निषेध म्हणून संबधीत व्यक्तींंवर कायदेशीर कारवाईची मागणी करत जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संजय गरुड,डि.के.पाटील, विलास राजपुत, प्रदिप लोढा, कैलास पाटील, नाना पाटील, किशोर पाटील, दगडु पाटील, भगवान पाटील,अरविंद चितोडीया,संदीप हिवाळे,जितेश पाटील,दिपक रेशवाल,प्रभू झाल्टे,अहेफाज मुल्लाजी,अजहर शेख,राजु शेख आदींसह पदाधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.