नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ विभागाने मध्य रेल्वेच्या मनमाड-नाशिकमार्गे जाणाऱ्या एकूण 18 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आणि हिवाळ्यात सहलीला निघालेल्या पर्यटकांची प्रवासी अडचण होणार आहे. भुसावळ विभागाने रद्द केलेल्या गाड्यामुळे अनके चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. यामुळे आपण जर प्रवासाच्या दृष्टीने नियोजन करीत असाल तर आपली गैरसोय होणे अटळ आहे. यामुळे तुम्हाला ठरलेल्या ठिकाणी पोहचण्यात अडथळा ठरू शकते.
सध्या नांदगाव रेल्वेस्थानकात दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गावर जाणाऱ्या गाड्यांना ब्लॉक देण्यात आला आहे. या गाड्या रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यात 24 डिसेंबर, शुक्रवारी धावणारी हावडा-मुंबई (क्रमांक 12780), 26 डिसेंबर, रविवारी धावणारी मुंबई-हावडा (क्रमांक 12869) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी, 24 डिसेंबर रोजी धावणारी हालिया-कुर्ला (क्रमांक 12812), 26, 27 डिसेंबर रोजी अनुक्रमे रविवारी व सोमवारी धावणारी कुर्ला-हालिया (क्रमांक 12811) या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 28 डिसेंबर, मंगळवारी धावणारी पुरी-कुर्ला (क्रमांक 22866), 30 डिसेंबर, गुरुवारी धावणारी कुर्ला-पुरी (क्रमांक 22865) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. 23 व 27 डिसेंबर रोजी अनुक्रमे गुरुवार व सोमवारी धावणारी भुवनेश्वर-कुर्ला (क्रमांक 22865) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. 25 व 29 डिसेंबर रोजी अनुक्रमे शनिवार व बुधवारी धावणारी कुर्ला-भुवनेश्वर (क्रमांक 12879) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. तक्त्यात दिल्या प्रमाणे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. मात्र या सोबत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही अधिक गाड्या सुरू केल्या गेल्या आहे. यामुळे वेळापत्रक बघून आपल्या प्रवासाचे नियोजन केलेले योग्य राहील.
नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी राज्यराणी, पंचवटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या सुरू झाकल्या आहेत. जानेवारीपासून मेमू गाडी सुरू झाली तर त्यात नाशिक-कल्याण मेमू लोकलची भर पडणार आहे. 1 नोव्हेंबर 1975 रोजी नाशिकरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली होती. यामुळे नाशिककरांना मुंबई गाठणे सहज शक्य झाले. यामुळे उद्योग व्यावसायिक करणात नाशिक करीता पंचवटी नांदी ठरली आहे.