जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याच्या मंत्री मंडळाची बैठक २७ गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता मंत्रालयात होणार आहे, यावेळी राज्यातील महत्वाचे नेते राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित असणार आहे यावेळी जळगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण निर्णय वरिष्ठ नेते घेण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील काही गट व नेते आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी आपल्या पथ्यावर पाडून घेण्यासाठी अनेकांनी वरिष्ठांकडे आपले प्रयत्न सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी मध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात घमासान सुरू झाले आहे, विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्ती आमदारांवर अद्याप पर्यत न घेण्यात आलेल्या निर्णयाची न्यायालयाकडून विचारणा झाली त्या यादीत एकनाथराव खडसे यांचे देखील नाव आहे, याबाबत निर्णय राखीव असला तरी राज्यपाल नियुक्ती आमदारांचा विषय पुन्हा चर्चेला आला या वृत्ता मुळे खडसे समर्थकांचा उत्साह गगनात मावेनासा झाला, खडसेंना काही दिवसात आमदारकी मिळणार त्यासोबत मंत्री पदाची अपेक्षा खडसे समर्थकांना आहे.
समर्थकांना महत्वपूर्ण पदे..
दरम्यान, संघटनात्मक दृष्ट्या जिल्ह्यातील महत्वपूर्ण पदांवर खडसे यांच्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डींग लावण्यात आली आहे खडसेंना आमदारकी मिळाल्यास ते अधिक सक्रिय होतील हे जितके खरे आहे तितके अधिक जिल्ह्यात मोकळ्यापणाने निर्णय घेण्यासाठी खडसे समर्थकांना महत्वपूर्ण पदे मिळण्यासाठी हालचाली सुरू आहे.