जिल्हा प्रशासनात खळबळ : लाभार्थ्यांनी केले खासदार उन्मेश दादा यांच्या भूमिकेचे स्वागत
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | – जागतिक बॅंकेच्या अर्थ सहाय्याने मराठवाडा व विदर्भा करिता नियोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा प्रकल्प गेल्या सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सदरील प्रकल्पात जळगाव जिल्ह्याचा समावेश करून घेतला होता. सुरुवातीच्या काळात सदरील प्रकल्पास लाभार्थी शेतकऱ्यांची कुठलेही तक्रारी प्राप्त होत नव्हत्या. परंतु मागील ४-५ महिनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मुख्यतः (ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच खरेदी, शेडनेट उभारणी इ. ) तसेच शेतकरी गटाकरिता योजना (कृषि औजारे बँक खरेदी) याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःकडील भांडवल अथवा सदर रक्कम व्याजाने घेऊन साहित्य खरेदी केलेल्या असून आजतागायत अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे पोकराअंतर्गत लाभार्थी शेतकरी/शेतकरी गटांना तत्काळ अनुदान वितरित व्हावे अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार असल्याचा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पोकरा योजनेचे प्रकल्प संचालक यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की
जागतिक बॅंकेच्या अर्थ सहाय्याने मराठवाडा व विदर्भा करिता नियोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा प्रकल्प गेल्या सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सदरील प्रकल्पात जळगाव जिल्ह्याचा समावेश करून घेतला होता. सुरुवातीच्या काळात सदरील प्रकल्पास लाभार्थी शेतकऱ्यांची कुठलेही तक्रारी प्राप्त होत नव्हत्या. परंतु मागील ४-५ महिनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मुख्यतः (ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच खरेदी, शेडनेट उभारणी इ. ) तसेच शेतकरी गटाकरिता योजना (कृषि औजारे बँक खरेदी) याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःकडील भांडवल अथवा सदर रक्कम व्याजाने घेऊन साहित्य खरेदी केलेल्या असून आजतागायत अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत
सदरील प्रकल्पास जागतिक बँकेने निधी उपलब्ध करून दिलेला असून देखील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे.
मी आपणास या पत्राद्वारे इशारा देऊ इच्छितो की, दि.२७/१२/२०२१ पर्यंत शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यास मी स्वतः शेतकऱ्यांसह मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा पवित्रा घेईल. असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिला आहे. या आशयाच्या प्रति त्यांनी मा.आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे तसेच मा.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव यांना देखील देण्यात आल्या आहेत.
खासदाराच्या भूमिकेचे लाभार्थीमध्ये स्वागत
मागील ४-५ महिनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मुख्यतः (ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच खरेदी, शेडनेट उभारणी इ. ) तसेच शेतकरी गटाकरिता योजना (कृषि औजारे बँक खरेदी) याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःकडील भांडवल अथवा सदर रक्कम व्याजाने घेऊन साहित्य खरेदी केलेल्या असून आजतागायत अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे केल्या होत्या. आज
खासदाराच्या आंदोलनाच्या भूमिकेचे लाभार्थीमध्ये स्वागत करण्यात येत असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.