जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर टाकळी दरम्यान एका अज्ञात वाहन व इंडीगो कारच्या झालेल्या अपघातात २ जागीच ठार झाले. तर एका महिलेचा उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला. या भीषण अपघातात सहा महिन्याचे बाळ सुदैवाने बचावले आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान टाकळी ते जामनेरच्या दरम्यान नागदेवता मंदिराजवळ भुसावळ येथून औरंगाबाद येथे लहान भावाच्या लग्नासाठी जाणाऱ्या पंकज गोविंदा सैंदाणे(वय२८),सुजाता प्रवीण हिवरे(वय३०) हे २ जण जागीच ठार झाले तर प्रतिभा जगदीश सैंदाणे यांचा उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला. या भीषण अपघातात मयत झालेले पंकज सैंदाणे यांचा ६ महिन्यांचा स्पंदन सैंदाणे हा चिमुकला बचावला. टाटा इंडिगो(एम.एच.१८/डब्लु- २४१२)या गाडीला अज्ञात वाहनाने समोरून कट मारल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला अज्ञात वाहन हे घटनास्थळावरून पसार झाले आहे.
जखमींमधील प्रतिभा जगदीश शेंगदाणे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला असुन वर्षा पंकज शिंगदाणे ,नेहा राजेश अग्रवाल यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तात्काळ मदतकार्य करून अपघातग्रस्त गाडीतील ६ महिन्याच्या बाळाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथून जामनेरला येत असताना प्रवासी रिक्षाला लाकडाने भरलेल्या गाडीने जबर धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच पुन्हा आज तिघांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.मयत पंकज सैदाणे हे आपल्या भावाच्या लग्नासाठी आज हळद व उद्या लग्न असल्याने सकाळी भुसावळ येथुन औरंगाबाद जायला निघाले होते. त्यांच्या सोबत सुजाता हिवरे हि महिला ब्युटीशियन असुन त्याही गाडीत त्यांच्या सोबत जायला निघाल्या होत्या.रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने लग्न घरातील आनंदाचे वातावरण आता स्मशान शांततेत बदलले.