मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉनच्या रुग्ण वाढीला सुरुवात झाली असून शासनाकडून खबरदारी घेण्याचे2 आवाहन करण्यात आले आहे. आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं ओमिक्रॉनचे रुग्ण मुंबईत आढळून आले आहे. राज्यात आज 20 रुग्ण मुंबईत आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ या सणाची सुरुवात होत असताना ओमिक्रॉनच्या रुग्ण वाढीला सुरुवात झाली आहे. नाताळ व नव वर्षाचं स्वागत अतिशय साधेपणाने तसेच नव्या ओमिक्रॉनचे नियम पाळून साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
विषाणूचा नवा प्रकार आणि त्याचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळावी. घरीच थांबून हा सण साजरा करावा जगाला शांती आणि प्रेमाची शिकवण देणारे प्रेषित येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळ निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद आणि उत्सवाचे हे पर्व साजरे करताना जगावर आलेल्या कोरोना संकट ओळखून काळजी घ्यावी. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात नेमके रुग्ण कुठे आहेत ?
राज्यात आज ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 11 रुग्ण मुंबई, 6 रुग्ण पुणे, साताऱ्यात 2 तर अहमदनगरमध्ये 1 नवा रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांचा एकूण आकडा आता 108 वर पोहोचला आहे.