सौंदर्य प्रसाधने ही महिलांच्या निगडित महत्वपूर्ण मानले जातात. मात्र हे केव्हा ? कधी ? व कधी करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो जेव्हा एखाद्या स्त्रीला आई होण्याची चाहुल लागते. नेमकं तेव्हा सौंदर्य प्रसाधना वापरा पासून थांबलं पाहिजे काही कंपन्यांच्या सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. आणि या रसायनांचा धोका आई आणि बाळाच्या आरोग्याला असतो. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये या काळात हार्मोनल बदल होत असतात. याचा परिणाम त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग अशावेळी सौंदर्य प्रसाधनां पासून गर्भवती स्त्रीयांनी दोन हात लाभ राहिले पाहिजे.
जो की गर्भाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर गर्भवती महिलांमध्ये या दिवसात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यामुळे अशाप्रकारे रसायनयुक्त क्रीम्स वापरल्यास महिलांना अँलर्जी होऊ शकते. अँटी-एजिंग आणि काळे डाग यावर बाजारात असंख्य क्रीम्स मिळतात. आपण त्यांचा वापरही करतो. क्रीममध्ये रेटिनॉइड्सचा वापर केलेला असतो. त्वचेसाठी ही प्रसाधने हानीकारण ठरु शकतात. त्यामुळे रसायन युक्त असलेली सौंदर्य प्रसाधने गर्भवती महिलांनी वापरणे टाळले पाहिजे.
परफ्यूम्सचा वापर करू नये
अनेक महिलांना रोज डिओडोरंट्स आणि परफ्यूम वापरण्याची सवय असते. गर्भवती महिलांन साठी त्रासदायक ठरणारा आहे. डिओडोरंट्स आणि परफ्यूमचा वापर करु नये. कारण याचा सुंगधाने महिलेला उलटी, मळमळ, चक्कर येणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच या सुंगधाने अँलर्जीची भीती असते. याच दिवसात गर्भवती स्त्रीने 9 महिन्यात आणि त्यानंतर किमान वर्षभर तरी केस काळे करु नये केस काळे करण्यासाठी महिला हेअर डाईचा अधिक वापर करीत असतात यामुळे अनके त्रासांना सामोरे जावे लागू शकते. हेअर डाईमध्ये अमोनियाचा वापर केला जातो. यामुळे बाळाला देखील त्रास होऊ शकतो.
नेल पॉलिश पोटात गेल्यास
गर्भवती महिलांनी नेल पॉलिश या दिवसांमध्ये वापरणे चुकीचे आहे. नेलं पॉलिश अधिक केमिकल युक्त असते नेल पॉलिशमध्ये असलेले रसायन पोटात गेल्यास हे गर्भासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नेल पॉलिश या दिवसात लावणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. गर्भवती महिलांनी यादिवसांमध्ये नैसर्गिक म्हणजे हर्बल युक्त वस्तूंचा वापर करावा. हेअर रंगासाठी हर्बल मेंहदीचा वापरल्यास तुम्हाला होणार त्रास टळू शकतो. त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती घटकांचा वापर आरोग्य जपण्यास फायदेशीर ठरणारे आहे. त्वचेची निगा राखण्याकरिताही नैसर्गिक तेलांचा उपयोग करावा जेणे करून बाळा सह गर्भवती स्त्रीचे आरोग्य चांगले राहील.