जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ६, ७, ८, ९ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येत आहे. यंदाचे हे २० वे वर्ष असल्यामुळे या वर्षी प्रतिष्ठान एक दिवस वाढवून चार दिवसांचा हा महोत्सव करणार आहे.
सालाबादाप्रमाणे या महोत्सवास जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचप्रमाणे उदयोन्मुख व आश्वासक अशा अनेक कलावंतांना सहभागी करून घेण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे महोत्सवातील प्रत्येक सत्र हे प्रेक्षणीय व श्रवणीय असणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ रोजी महापौर सौ जयश्री महाजन जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन भारतीय स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री मुकेश कुमार सिंग युनियन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री गिरिजा भूषण मिश्रा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती अंजली भावे तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लि चे झोनल मॅनेजर श्री अग्रवाल तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची वेळ संध्याकाळी ७ ते ११ असणार असून कोविड-१९ या महामारीच्या शासकीय नियमनांच्या अधीन राहून रसिकांना मास्क शिवाय प्रवेश नसून प्रवेशद्वारावर त्यांचे शारीरिक तापमान घेतले जाणार आहे व हात सॅनिटाइज केले जाणार आहेत त्यामुळे रसिकांनी ६.३० वाजता प्रवेश घेणे अपेक्षीत आहे.
महोत्सवाची कार्यक्रम पत्रिका खालीलप्रमाणे आहे.
बालगंधर्व संगीत महोत्सव -२०२२
(द्विदशकपूर्ती महोत्सव)
स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर
वेळ : संध्याकाळी ७ ते १०
सहभागी कलावंत
दि. ६.१.२०२२
१) मानसी मोदी
मानसी करानी – कथक भरतनाट्यम जुगलबंदी
२) संदीप चटर्जी – संतूर
संदीप घोष – तबला साथ
दि. ७.१.२०२२
मर्मबंधातली ठेव ही … नाट्यसंगीताचा एक विशेष कार्यक्रम
वेदश्री ओक
धनंजय म्हसकर
श्रीरंग भावे
ऑर्गन – मकरंद कुंडले
तबला – धनंजय पुराणिक
व्हायोलिन : श्रुती भावे
दि.८.१.२०२२
१) पं. विनोदकुमार द्विवेदी – धृपद गायन.
२) पं. कुमार बोस व कुणाल पाटील – तबला पखवाज जुगलबंदी.
दि. ९.१.२०२२
१) स्निती मिश्रा – शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन
२) कोकण कन्या बँड
सहभागी कलाकार
अरुंधती तेंडुलकर
आरती सत्यपाल
निकिता घाटे
रसिक बोरकर
स्नेहा आयरे
विशाल सुतार
साक्षी मराठे
संगीतकार – रविराज कोलथरकर
सूत्र संचालन – दीप्ती भागवत.