जामनेर राजमुद्रा दर्पण | येथील सकल मराठा समाजाचा वधू वर परिचय मेळावा व सूची पुस्तकीचे प्रकाशन संपन्न झाले.मेळाव्यास मराठा समाजाची उच्च न्यायालयात आरक्षण विषयक बाजू मांडणारे विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उप वर वधुंनी आपला परिचय करून दिला.यात परिचय करून देणाऱ्या मध्ये मुलींपेक्षा उपवर मुलांचे प्रमाण जास्त होते. एकूण २०० वधू वरांनी याठिकाणी आपला परिचय करून दिला. यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना विनोद पाटील बोलत होते.छत्रपतींचे नाव घेतांना महाराजांना आवडणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे माता भगिनींचा सन्मान व आदर करणे. ही एकच गोष्ट जर कटाक्षाने पाळली तर कुठेही कोपर्डी सारखी घटना होणार नाही व देशातील भगिनी सुरक्षित कुठेही फिरू शकतील.आरक्षणाची बाजू मांडताना आपण सर्वांनीच मला मोलाची साथ दिली. कुठे तरी आपण कमी पडलो म्हणून आपल्याला यश मिळाले नाही.यासाठी राज्याचे आजचे सरकार व मागचे सरकार हे दोन्ही ही शासन याला जबाबदार असल्याचे वक्तव्य यावेळी विनोद पाटील यांनी केले.यावेळी समाजाच्या प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर विनोद पाटील,आबासाहेब पाटील, डी.एन.चौधरी, संजय गरूड, डी डी.के.पाटील,दिलीप खोडपे,डॉ.मनोहर पाटील,तुषार पाटील, वंदना चौधरी,विश्वजीत पाटील,जे.के.चव्हाण,निता पाटील,जळकेकर महाराज,प्रा.शरद पाटील,प्रमोद पाटील,नाना राजमल पाटील, दिलीप पाटील,
डॉ.प्रशांत भोंडे,डॉ.नंदलाल पाटील,श्रीराम पाटील,डॉ.बाजीराव पाटील,दीपक पाटील,प्रमिला पाटील,कमलाकर पाटील, प्रल्हाद बोरसे,अर्जुन पाटील,दत्ता साबळे,प्रवीण गावंडे,राम अपार,अमोल पाटील,योगेश पाटील,रवी हडप,यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारी समाजातील प्रतिष्ठित मंडळी या वेळी मेळाव्याला उपस्थित होते.सकल मराठा समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे या वेळी अभिनंदन करण्यात येऊन त्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. सुत्रसंचलन किशोर खोडपे, एस.टी.चौधरी यांनी केले.