जळगाव राजमुद्रा दर्पण | भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय स्व.अटल बिहारीजी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त मारूती मंदीर अयोध्या नगर येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी,भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप रोटे, मंडळ क्रमांक ३ अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, नगरसेवक विरेनदादा खडके , उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे, मंडळ सरचिटणीस किसन मराठे,नाना देशमुख,योगेश निंबाळकर, भा.ज.यु.मो. पदाधिकारी मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, गणेश महाजन, राहुल मिस्तरी विक्की सोनार , सागर जाधव, जयंत चौहान, भुषण जाधव, कोमल तळेले,शिवा कंडारे,सागर चव्हाण, किरण दुसाने ,हर्षल पुरोहित ,योगेश डोळे, हर्षल इंगळे, निखिल सूर्यवंशी , प्रफुल्ल कोळी, नीलेश लोखंडे, सूरज जोनवाल, धीरज शेलोदे उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनात अनमोल सहकार्य भुषण पाटील, चेतन कोळी,भावेश जैन ,शुभम थोरात,संजय पवार , दिपक बाविस्कर,चेतन थोरात, अक्षय बिह्राडे,शुभम वाणी, हितेश खडके, हितेंद्र काळे ,राकेश चौधरी आदी उपस्थित होते.