मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण |शहरात अचानक पणे जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन केले आहे. ही घटना आज रात्री घडल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदार संघामध्ये तसेच बोदवड मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे व शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. महा विकास आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रोहिणी खडसे व राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचा वाद झाल्यापासून वादाची ठिणगी पडली, यातून राष्ट्रवादीने देखील पुढाकार घेत यासंदर्भात िल्हाधिकार्यांना निवेदन दिले. यानंतर बोदवड येथील पदाधिकारी व शिवसैनिक आणि एकत्र येत त्यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यातच रोहिनी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना चोप देण्याची भाषा करून आणखी वादंग वाढले. यावरून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन खडसे पिता-पुत्री पासून माझ्या जीवाला धोका असल्याचे निवेदन दिले माझ्या जीवितास काही झाल्यात खडसे पिता-पुत्री यांना दोषी मानावे असे देखील या निवेदनात म्हटले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन शिवसैनिकांनी बोदवड पोलीस ठाण्यात दिले गेले होते. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करीत लक्ष वेधून घेतले आहे.
आज रात्री साडेआठच्या सुमारास रोहिणी खडसे या मालेगाव वरून मुक्ताईनगर कडे येत असताना एमएच 19. 19. 19 या क्रमांकाच्या यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग दाभाडे आणि गाडीचा ड्रायव्हर होता यात काही त्याच्या मदतीने त्यांच्या गाडीच्या काठावर आघात करण्यात आले त्यांना काही दुखापत झाली नाही मात्र हल्लेखोरांनी काही क्षणात परत झाले आहे तर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉड असल्याचे दिसून आले आहे.