मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यात कोरोनाने कहर केल्यानंतर पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण देखील आढळून येत आहे. यासाठी शासनाच्या वतीने योग्य त्या उपाय योजना करण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने आढळून येत असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राज्यात सक्रीय रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अयोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. चिंतेचे कारण म्हणजे रुग्णसंख्येत 6 दिवसांत तिपटीनं वाढ झाली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या मंत्री मंडळ बैठकीत हा विषय अधिक चर्चेत आला आहे. या प्रकरणी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वाढवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.
राज्यात दिवसभरात एकूण रुग्ण किती?
मनपा आयुक्त इकबाल सिह चहल यांनी या संदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. राज्यात दिवसाला अनपेक्षित रुग्ण संख्या वाढत आहे. आज एकूण 1 हजार 426 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईतही 800 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मुंबईत आज एकूण 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच राज्यात ओमायक्रॉनचे 26 रूग्णांचं निदान झाल्याचे समाधान कारक स्थिती आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात कोरोनाचा वाढता आकडा पाहता पालिका प्रशासनाने हाय-अलर्ट जारी केले आहे. गेल्या काळात रुग्णाची उपचारासाठी झालेली वणवण यासाठी विशेष उपाय योजना आखण्यात आल्या आहे.