जामनेर राजमुद्रा दर्पण : सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील ढेबेवाडी रुवले येथील ८ वर्षीय चिमुकलीवर विक्रुत मानसिकतेचा नराधम संतोष थोरात याने दोन दिवसांपूर्वी अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून.त्यानंतर या नराधमाने तिची हत्या केली. या निंदनीय घटनेचा प्रतिनिधीक स्वरूपात समाज बांधव म्हणून तालुक्यातील सुतार जनजागृती सेवा संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव,तालुकाध्यक्ष समाधान मेतकर,गणेश सुतार, संजीव सुर्यवंशी,महेंद्र जाधव,करण,सांळुके,ईश्वर जंजाळकर,पवन सुर्यवंशी, दादाराव चव्हाण यांनी तहसील कार्यालयात निषेध नोंदवत ह्या घटनेतील नराधम आरोपी विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून खटल्याचे कामकाज शासनाने अँड.उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवुन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली.