जामनेर राजमुद्रा दर्पण |येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका प्रतिज्ञा सर्व बालिकां कडून घेण्यात येवुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.सोनवणे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील बालिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थीनिंनी सावित्रीमाईच्या वेशभूषेत आपली भूमिका साकारली.त्यावेळी सोनवणे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक मनोगतात विद्यालयाच्या उपशिक्षिका एम.आर.भारंबे, शितल पाटील यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सोनवणे यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. प्रास्ताविक विजय कोळी सर यांनी केले.आणि आभार योगेश बावस्कर यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.