जळगाव
दिव्यांग बांधवांसाठी घरातील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचे शिधा पत्रिकेत नाव असल्यास संबंधीत संपूर्ण कुटूंबाला 35 किलो धान्य वाटप करण्यात यावे. असा अध्यादेश महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून वर्षभरापूर्वी काढण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही होत नसल्यामुळे दिव्यांग सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी आजपासून उपोषण सुरु केले आहे.
यासंदर्भात दिव्यांग सेनेने जागतिक अंपग दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून यासंदर्भात शहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना 35 किलो धान्य मिळण्याबाबतच्या सुचना देण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीबद्दल न्याय न मिळाल्यामुळे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग सेनेने उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात संघटनेचे पदाधिकारी भरत रामा जाधव, जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, शेख शकील, हितेश तायडे, हेमराव म्हस्के, तोशिफ शहा, मुत्ताजीम खान, सादीक पिंजारी, नितीन सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.