अमळनेर (प्रतिनिधी):-
तालुक्यातील मारवड येथे खासदारांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.
मारवड येथे तत्कालीन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या संकल्पनेतून मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत पूर्णत्वास आलेल्या श्री संताजी जगनाडे महाराज सार्वजनिक सभागृह लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी खासदार उन्मेष पाटील यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सभागृहाचे कोनशिला अनावरण माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर सभागृहाचे नामकरण माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी सभागृहात संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी जैतपीर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संजय सोनवणे, मारवडचे नवनिर्वाचित बिनविरोध ग्रा.पं. सदस्य शितल दिनेश चौधरी तसेच अमळनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा विशेष सत्कार खासदारांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी पंचपदी भजन व संताजी प्रतिमा पूजन, दुपारी कार्यक्रमानंतर महाप्रसाद व सायंकाळी सत्संग व हरिपाठ आणि रात्री ह.भ.प. कोमलसिंग महाराज धुळे यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष लोटन जगन्नाथ चौधरी, उपाध्यक्ष अशोक चौधरी, सचिव प्रदीप चौधरी, सदस्य मधुकर चौधरी, छोटू चौधरी, गजानन चौधरी, किरण चौधरी,विनोद चौधरी, पंकज चौधरी, स्वप्नील चौधरी व ज्येष्ठ मार्गदर्शक आसंबर चौधरी, बापू चौधरी, तसेच समस्त तेली समाज मारवड यांनी केले होते.