भडगाव (प्रतिनिधी)
: तालुक्यातील वडजी येथील टी. आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी. डी. पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ मोठया थाटात संपन्न झाला. संपूर्ण समारंभ विद्यालयाच्या आजी- माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी घडवून आणला. विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. अध्यक्षस्थानी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील होते. व्यासपीठावर वडजी गावाचे भूमीपुत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता सुरेश बोरसे, नाशिक परिक्षेत्र डीवायएसपी किशोर मोरे, जिल्हा बँक संचालक मेहताबसिंग नाईक, भडगाव पंचायत समितीचे माजी सभापती अभिमन पाटील, इंडियन एअर फोर्सचे अनिल जाधव, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आनंद मोरे, गुलाबराव देवकर इंजिनिअरींग काॅलेजचे विभाग प्रमुख आर. वाय. पाटील,एअर इंडियात कार्यरत कैलास गायकवाड, गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्टर शांताराम कुंभार, साहित्यिक डॉ वाल्मिक अहिरे, सेवानिवृत्त सर्व माजी सैनिक, नगरसेविका योजना पाटील, प्राचार्य डी. डी. पाटील, सरपंच मनिषा गायकवाड, पंचायत समिती माजी सभापती मनिषा पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजूभाऊ सोनवणे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी राठोड सह सर्व सोसायटी पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सर्व शाखांचे प्रमुख़, विद्यालयाचे सर्व सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ठ मित्र परिवार, पत्रकार उपस्थित होते. प्रतिमा पुजन, दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक विद्यालयाचे माजी प्रभारी मुख्याध्यापक बी. वाय. पाटील यांनी केले. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जडणघडणीत शाळेच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. डीवायएसपी किशोर मोरे यांनी मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करा व आदर्श विद्यार्थी व्हा असा सल्ला दिला. अनिल जाधव यांनी आई वडिलांनी मुलांना वेळ द्यावा आणि सुसंस्कारित पिढी निर्माण करावी ही अपेक्षा व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी प्राचार्य डी. डी. पाटील यांचे शालेय जीवनातील विदयार्थी योगदान, ज्ञानदान, त्यांनी दिलेली शिकवण याविषयी आपले विचार मांडले. विशेष म्हणजे डी. डी. पाटील सरांची सेवेची सुरूवात आणि सेवानिवृत्ती वडजी याच गावी झाली. इंग्रजी विषय सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थी घडविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांच्या हातून नेहमी झाले. महाराष्ट्र भुषण आदर्श शिक्षक, आदर्श गुणवंत मुख्याध्यापक प्राचार्य, कोरोना योद्धा, शिक्षक प्रेरणा असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. माजी विदयार्थी, संस्थेचे चेअरमन, सर्व मुख्याध्यापक प्राचार्य, टी. आर. पाटील विदयालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, ग्राम पंचायत, सोसायटी, नातेवाईक, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक आदि मान्यरांच्या हस्ते डी. डी. पाटील यांचा सुवर्णमहोत्सवी सेवपूर्ती निमित्त सन्मानित करण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या पत्नी नगरसेविका योजना पाटील, डी. डी. पाटील, पुत्र संदेश, कन्या राजश्री सह सर्वांना अक्षरशः गहिवरून आले आणि त्यांच्या आसवांचा बांध फुटला. विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हा कार्यक्रम झाला. विदयालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात विदयालयाची दुमजली इमारत झाली, कनिष्ठ विज्ञान महाविदयालय सुरू झाले. आणि इयत्ता १०वी चे बोर्ड ही झाले. विदयालयाला एक आगळी वेगळी ओळख तालुक्यात निर्माण करून देण्यात डी. डी. पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. उपस्थितांमध्ये वडजी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आजी-माजी विद्यार्थी, नातेवाईक, पालक, संस्थेचे स्थानिक सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाचे माजी विद्यार्थी शरद जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी तथा माजी सरपंच बी.वाय पाटील सह माजी विद्यार्थी सुधाकर पाटील, सह माजी विद्यार्थी भाऊसाहेब पाटील, वैशाली पाटील, अॅड.रविंद्र पाटील, गणेश वाणी, स्वदेश पाटील, एन.टी.पाटील, मनिष महाजन, जगदीश पाटील, महेश चव्हाण, रोहिदास पाटील, भाईदास पाटील, राहुल पाटील सह सर्व माजी विद्यार्थी, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सहकारी कर्मचारी यांनी नियोजनबद्ध सुवर्णमहोत्सवी सेवापूर्ती समारंभ साजरा केला.