चाळीसगाव:
समाजामध्ये मातृत्व दातृत्व आणि समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या महाराष्ट्रभरातील निवडणूक समाजसेवकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांना यंदा देण्यात येत असून अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती यांनी तसे पत्र देऊन धाडीवाल यांना कळविले आहे पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने समाजात अशाप्रकारचे काम करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचे मनोबल वाढते व काम करण्यास प्रेरणा मिळते या उदात्त हेतूने या समितीने हा राज्यस्तरीय पुरस्कार वर्धमान धाडीवाल यांना जाहीर केला असून दिनांक १६ जानेवारी रोजी मराठा दरबार मालेगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे विशेष पोलीस अधिकारी मालेगाव परिमंडळ रंजन खरोटे अध्यक्ष सामाजिक प्रबोधन संघ महाराष्ट्र व सचिव अमोल निकम यांनी त्यांना सहपरिवार आमंत्रित केले असून सदर प्राप्त पुरस्कारामुळे वर्धमान धाडीवाल यांचे समाजातून अभिनंदन होत आहे