भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात व ट्रामा केअर सेंटर मध्ये दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजेला १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण लसीकरण सुरू करण्यात आले.
३ जानेवारी २०२२ पासून ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे केव्हिड – १९ चे लसीकरण सुरू झालेले आहे.सकाळी ०९:०० वाजेपासून ते ०२:०० वाजेपर्यत २०० ते २२५ जणांची लसीकरण करण्यात आले. भुसावळ तालुक्यामध्ये वरणगांव ग्रामीण व भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर असे दोन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आलेल्यांची काळजी घेण्याचा दृष्टीने ग्रामीण रुग्णालयाला सरकारने प्राधान्य दिले आहे.
जसे गावांमध्ये लसिकरणाचे शिबीर लावण्यात येत आहे त्याप्रमाणे १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी शिबीर लावण्याची परवानगी नाही.कारण असे की,१५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी पहिलेच लसीकरण सुरू झालेले आहे. त्यामध्ये कुणाला रिअँक्शन किंवा चक्कर आले अशा वेळी घटनास्थळी उपचारासाठी अत्यावश्यक सेवा बेड व ऑक्सिजन उपलब्ध हवे यासाठी ग्रामीण रुग्णालयाची नेमणूक करण्यात आली आहे.
या प्रसंगी भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले यावेळी प्रथम लसवंत अपूर्वा गणेश फेगडे हिने लस घेतली लस दिल्यानंतर आ.संजय सावकारे यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले . यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी, डॉ शिवाजी भोसले, डॉ
उमेश मुकुंद , डॉ O.S YT महाजन भाऊसाहेब , स्टाफ नर्स सोनाली बाविस्कर , निरंजना तायड़े ,तसेच वार्ड बॉय व कर्मचारी उपस्थित होते .