भुसावळ – क्रातीज्योति सावित्री ज्योतिबा फुले यांची जयंती शिवाजीनगर भागातील मैत्री सागर बुद्ध विहार , सिटी स्कैन अभ्यासिका येथे उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी स्कैन गृपचे अधिकारी व रेल्वेचे एपीओ रामटेके होते .प्रमुख पाहुणे म्हणून महिला समुपदेशन कॉन्सिलर सौ भारती म्हस्के , शिक्षिका अंजुम खान , जयश्री इंगळे , प्रकाश सोनवणे , अभ्यासिका शिक्षक प्रमोद निळे , सुमन ताई , श्री व सौ चोथमल , सामाजिक कार्यकर्ते अकबर गवळी , आदीं मान्यवर होते .
प्रारंभी सावित्रीमाई फूले यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी ज्ञानदानाचे सत्कार्य करणाऱ्या शिक्षिकांना रजिस्टर ,पेन , पुष्पगुच्छ देवून
सत्कार करण्यात आला तसेच केक कापून आनंद व्यक्त केला .
शिका संघटित व्हा, हक्कासाठी संघर्ष करा असा संदेश देणाऱ्या तळागळातील दिनदुबळ्यासह सर्व समाजातील महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला अनेक अडचणी व संकटे यांवर मात करीत समाजसेवेचे व्रत घेवून , स्त्रियांना चूल आणि मूल या ही पलिकडचे जग आहे हे सांगणारी माय माऊली सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहीती यावेळी श्री रामटेके , भारती म्हस्के , संगीता भामरे यांनी दिली . तर अंजुम खान यांनी कविता सादर केली . कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस तथा ,महिला मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष, दक्षता समिती सदस्य सौ संगीता राजेंद्र भामरे यांनी केले . अभ्यासीकेतील लहान मुले वमुली यांना खाऊ वाटण्यात आला .