मुक्ताईनगर प्रतिनिधी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष आणि सिंघम पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांना सेवा गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात औरंगाबाद येथील कार्यक्रमांमध्ये प्रदान करण्यात येणार होता परंतु अर्जंट बंदोबस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत म्हणूनच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जातात. अखेर त्यांना मुक्ताईनगर येथील त्यांच्या पोलिस स्टेशनमध्ये डाॅक्टर कुणाल सोनवणे,उपविभागीय पोलीस अधिकारी,फैजपुर भाग फैजपुर यांचे उपस्थितीत माणुसकी रूग्णसेवा समूहाच्या सर्व टीमने पुरस्कार प्रदान केला. यावेळी माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित हे देखील उपस्थित होते ह्या पुरस्काराबद्दल पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.तसेच मुक्ताईनगर येथील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करन्यात येत आहे.
तसेच पोलीस दलाकडून साजऱ्या होणाऱ्या पोलीस रेजिंग दिनाच्या दिवशी हा पुरस्कार मिळाल्याने पोलीस दलाचे मनोबल वाढले आहेत.तसेच पोलीस स्टेशनचे अंमलदारांना देखील प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले आहे.यावेळी खालील नमुद अंमलदारांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले आहेत
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री कुणाल सोनवणे सर
पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ,पो.हे.का गणेश मनुरे,श्रावण जवरे,अशोक जाधव,संतोष नागरे,असीम तडवी,रवींद्र मेढे,मंगल साळुंके,
नंदकिशोर धनके,अंकुश बाविस्कर,पत्रकार छबिलदास पाटील व टिम माणुसकी उपस्थित होते.