जळगाव : प्रतिनिधी
6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यंदाचा मुकनायक पुरस्कार दैनिक सकाळचे उपसंपादक कैलास शिंदे तर जेष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे , अल्हाद जोशी, यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान पुरस्कार वितरण दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व तीस ते पन्नास वर्ष पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ सेवा दिल्याबद्दल राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. त्याप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुकनायक व जीवनगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.
पाचशे पत्रकारांचा विमा काढणार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नेहमीच नावीन्य पुर्ण उपक्रम राबवित असतात गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील पत्रकारांना नऊशे हेल्मेट वाटप केले आहे. यावर्षी जिल्ह्यातील पाचशे पत्रकारांचा 1 लाखाचा अपघात विमा काढण्यात येणार असून पुरस्कार वितरण सोबत पत्रकारांना विमा प्रदान करण्यात येणार आहे.