नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स 800 अंकांनी घसरून 59 हजार414 वर आला आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरमध्ये 3 टक्के घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांना आज 60 सेकंदात 2.7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सेंसेक्सने दिवसात 59,352 चा खालचा स्तर आणि 59,781 चा वरचा स्तर गाठला.
आज बाजार उघडताच पहिल्या मिनिटात तो 600 अकांनी कोसळला. याच्या 30 शेअर्समधून केवळ 3 शेअर्स बढतमध्ये आहेत. 27 घसरणीत आहेत. कोसळणाऱ्या प्रमुख स्टॉकमध्ये टेक, बँक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा दीड-दीड टक्क्यांनी खाली आहेत. कोटक बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बँक, बजाज फिनसर्व्ह 1-1 टक्क्यांनी कोसळले आहेत.
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 233 अंकांनी कोसळून 17,686 वर व्यवहार करत आहे. म्हणजेच 17,768 वर उघढला होता. दिवसातून याने 17,797 चा वरचा आणि 17,671 चा खालचा स्तर बनवला. याच्या 50 शेअर्समधून 43 कोसळले आहेत आणि 7 बढतमध्ये व्यवहार करत आहेत. निफ्टीचे मिडकॅप, बँकिंग, फायनेंशियल आणि नेक्स्ट 50 इंडेक्स घसरणीत आहे.
यापूर्वी काल सलग चौथ्या दिवशी बाजारात बढत राहिली. बॉम्बे स्टॉक एक्सजेंजचा सेन्सेक्स 367 पॉइंट्सने वाढून 60,223 वर तर निफ्टी 120 अंकांनी बढतसह 17,925 वर बंद झाला. चार दिवसांमध्ये सेन्सेक्स 2400 अंकांनी वाढला आहे.