जामनेर शहरांमध्ये पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
आजच्या धावपळीच्या काळामध्येही पत्रकारांची नजर समाजातील विवीध घडामोडींवर असते,तसेच समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींवर ते नेहमीच धडपडत असतात, त्यामुळे जन-जागृतीसाठी पत्रकारांची भुमीका महत्वाची ठरत असते असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी पत्रकार दिनानीमीत्ताने माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या.सुरूवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेला नगराध्यक्षा महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले.कार्यक्रमाला जिल्हाचिटणीस नवल पाटील, नगरसेवक महेंद्र बावीस्कर, आतीष झाल्टे,सुहास पाटील, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे,दत्तात्रय सोनवणे, दिपक तायडे,ज्ञानेश्वर शिंदे,धोंडु पाटील,विजय शिरसाठ, कैलास पालवे आदी पदाधीकारी-पत्रकार बांधव उपस्थीत होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने ही पत्रकार दिना निमित्त ,राष्ट्रवादी कार्यालयामध्ये कार्यक्रम घेण्यात आला.जामनेर येथील न्यूज कार्यालयातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.