जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्ह्यात राष्ट्रवादीतील फेरबदलाच्या वृत्तामुळे व मुक्ताई नगर येथे भाजप नगरसेवकांचा झालेला शिवसेना प्रवेश यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, यासर्व घडामोडी मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे,पालकमंत्री गुलाबराव पाटील,मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव अधिक चर्चेत आहे जळगाव महापालिकेत भाजपचे २७ नगरसेवक फुटून सेनेच्या गळाला लागले व महापौर भाजप च्या जागी सेनेचा झाला यामध्ये आमदार गिरीश महाजनांना त्यांच्या बालेकिल्यात सेनेकडून धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पुन्हा मुक्ताईनगर येथील नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे.
भाजपला सावध राहण्याची गरज
पुन्हा एकदा खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर येथील नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश झाला यामुळे माजी मंत्री खडसे यांना देखील राजकारणातील कट्टर वैरी असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी धक्का दिला आहे. यामुळे जिल्ह्यात आता भाजपला सावध राहण्याची गरज आहे, आगामी काळात नगरपंचायत,नगरपरिषद,नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे यासाठी भाजपने कंबर कसण्याची गरज असून यामध्ये आमदार गिरीश महाजन नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जरी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भाजपचे पक्ष संघटन अद्याप तरी मजबूत आहे, भाजपला मानणारा एक मोठा समूह जिल्ह्यात आहे. पण खडसे यांचा प्रभाव देखील जिल्ह्यात नाकारता येणार नाही खडसे ज्या पक्षात घेले त्या राष्ट्रवादीची राज्यात सत्ता आहे, सत्ता असल्याकारणाने अनेक जण निवडणुकाच्या पार्श्भूमीवर खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे यामुळे आमदार महाजन यांना पक्ष संघटनेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
राज्यातील जबाबदाऱ्या आणि वेळ
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले आमदार गिरीश महाजन यांच्यावर राज्यातील मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, पक्षातील महत्वाचे आयोजन आमदार महाजन यांच्या शिवाय अपूर्ण आहे वेळोवेळी पक्षाकडून वाढत असलेल्या जबाबदाऱ्या, राज्यात करावे लागणारे दौरे यामूळे वेळ अपूर्ण पडत आहे, मात्र आमदार गिरीश महाजन जिल्ह्यात आल्या नंतर नेमक काय घडामोडी घडतील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.