जळगाव राजमुद्रा वृतसेवा | महापालिकेत सत्तांतर झाले भाजपच्या हातून महापालिका निसटली व शिवसेनच्या हाती लागली मात्र यामध्ये आधीच्या विकास कामाना देण्यात आलेल्या मंजुरी ठराव रद्द करण्यात येत आहे, भाजप नगरसेवकांना ते चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्या प्रमाणे विकासकामांच्या निधी वाटपावरून भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे, त्याच पार्शभूमीवर आज पिंप्राळा भागात विकास कामावरून आमदार राजूमामा भोळे व सेनेत नव्याने दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे समोर आले आहे.
नगरसेवकांचे दुर्लक्ष
विकास कामांचे उटघाटन व न लावण्यात आलेले फलक यामुळे नव्याने सेनेत दाखल झालेले भाजप नगरसेवक व आमदारांमध्ये नागरिकांच्या प्रत्यक्षात शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे, काही ठिकाणी रस्त्याची कामे अद्याप झालेली नसल्याने काही स्थानिक नागरिकांनी आमदार भोळे यांच्याकडे तक्रारी देखील यावेळी स्थानिक नागरिकांनी केल्या आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या तेव्हा नगरसेवक देखील दुर्लक्षित करीत असल्याची माहिती भाजपच्या एका नगरसेवकांनी दिली आहे.
या प्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांना राजमुद्राच्या स्थानिक प्रतिनिधी यांनी संपर्क केला असता संवाद होऊ शकलेला नाही, त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले स्वप्नील यांनी आमदार भोळे यांनी कोरोना लस घेतली असून ते आता बोलू शकणार नाही अशी माहिती दिली आहे.