जामनेर : प्रतिनिधी
कॉंग्रेस हा पक्ष नसुन एक विचार आहे. व तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून खांद्यावर जबाबदारी देण्यात आली व ती प्रामाणिक पणाने पार पाडुन कॉंग्रेस पक्षाचा विचार घराघरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार असा विश्वास नुतन तालुकाध्यक्ष म्हणून निवड झालेले शंकर पहिलवान राजपुत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. मुंबई येथे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व्ही. जे. एन. टी. प्रदेश अध्यक्ष मदन जाधव यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते शंकर राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तळमळीने कार्य करण्याची जिद्द व सामान्य कार्यकर्ता म्हणून शंकर राजपुत यांची ओळख आहे. आता त्यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाली. ही त्यांनी केलेल्या कामाची पावती असुन त्याचे चिज झाले आहे. कुठल्याही कार्यकर्त्यांसाठी व पक्ष वाढीसाठी धडपडणाऱा माणूस म्हणून प्रांताध्यक्ष नाना पटोले पासुन ते जिल्हाध्यक्ष बाळासाहेब यांच्या पर्यंत सर्वांनी एकमताने निवड केली. त्यास मान्यता दिली. मोठी जबाबदारी तालुकाध्यक्ष पद हे काटेरी मुकुट असतो. सर्वांशी सामंजस्य पणाने वागुन अनेक चांगल्या वाईट गोष्टींना तोंड देऊन सामोरे जावे लागते. पण निश्चितच शंकर राजपुत हे पक्षाचे कार्यकर्ते जोडुन पक्षाला भरभराटी मिळवुन देतील. अशी ग्वाही कॉंग्रेसचे माजी. तालुकाध्यक्ष जगनदादा लोखंडे यांनी दिली. त्यावेळी ईश्वर रोकडे, जगदेव बोरसे, सोनुसिंग राठोड सर, रऊफ शेख, संजय राठोड, अॅड. राजु मोगरे, विलास पाटील, पंकज पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, बंटी पाटील, चतरसिंग राजपुत, डॉ. मुळे, संदीप नेरीया यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.