जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस दिपक महाराज रिचवाल यांनी आज(७)रोजी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षात अजून एका चांगल्या कार्यकर्त्यांची भर पडली असे म्हणता येईल. दीपक महाराज यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेस च्या चिन्हावर नगरपरिषद निवडणूक लढविली आहे. माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी त्यांचे पुष्पगुच्छ आणि रुमाल टाकून स्वागत करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, श्रीराम महाजन,बाबुराव हिवराळे,रविंद्र झाल्टे, सुरेश माळी,कैलास नरवाडे, सुनील धनगर,विलास माळी, बापू लोहार,कैलास पालवे,गणेश चौधरी सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
*यांनी केला भाजपात प्रवेश*
संतोष माळी, शिवा मराठे,सुनील रितवाडे, राजू रितवाडे,संतोष रिचवाल, अशोक रिचवाल, प्रमोद गिरी,सुनील गिरी,राजू साठे,संजय साठे,दिनेश साठे, दिनेश वाघ,रघुनाथ माळी, शांताराम पालवे,गजानन लोहार,भाईचंद गायकवाड, सुनील गायकवाड, दिपक तायडे,राहुल राजपूत,मुन्ना पवार,सोपान गायकवाड, समाधान मोरे,संतोष दोषी ,अतुल दोषी,विजय मराठे, युवराज झाल्टे,संदीप वराडे,किरण रोकडे,राजू मोरे, संदीप मोरे, किशोर जोशी, अतुल रितवाडे,संदीप रितवाडे,भागवत रितवाडे,कैलास रितवाडे,अमोल रितवाडे,आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.