जळगाव राजमुद्रा वृतसेवा | शहराचे आमदार राजू मामा भोळे हे पिंप्राळा येथे विकास कामांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी तेथे विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला यावेळी काही नागरिक आणि आमदार भोळे यांच्यात शाब्दिक चकमक उडल्या यावेळी नागरिकांनी आमदार यांना म्हंटले की “ आपण शहराचे पाच वर्षे आमदार होते आणि आता देखील आमदार आहेत मात्र आजपर्यंत तुम्ही येथे फिरले नाहीत मग आज कामांचे श्रेय घेण्याचा अधिकार काय असे बोलून भांडण होत होते “ यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तेथे पोहचून वाद मिटवल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील खुलासा कुलभूषण पाटील यांनी केला आहे.
विघ्न संतोषी लोकांना उत्तर देणार
यावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञ निधीतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ६१ कोटींचा निधी शहराच्या विकासासाठी दिला आहे त्यातूनच हे काम सुरू असल्याचे उपमहापौर पाटील यांनी सांगितले आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक नियम आणि सूचनांनुसार कोरोनाच्या काळात कुठल्याही विकास कामांचे उद्घाटन करण्यात येऊ नये, जेणेकरून विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. पण तरीही शहराचा विकास होत आहे, विकास कामांना सुरुवात म्हणून काहींच्या पोटात दुखतं आणि अशा “ विघ्नसंतोषी लोकांना आम्ही विकास कामातूनच उत्तर देऊ “ असा खोचक टोला आमदार भोळे यांचे नाव न घेता उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लगावला आहे.