जळगाव : प्रतिनिधी
बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी संगीत नाटकांमधील नाट्यसंगीतांच्या सादरीकरणावर आधारित ‘मर्मबंधातली ठेव` ही संंगीत मैफल रंगली. मुंबई येथील श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर व वेदश्री ओक यांनी संगीत नाटकातील ‘गुंतता ह्रदय हे, मर्मबंधातली ठेव ही, जोहार मायबाप जोहार, हे सुरांनो चंद्र व्हा, अशी अजरामर नाट्यपदे सादर करुन श्रोत्यांना संगित नाटकांच्या विश्वात रममाण होण्यास भाग पाडले.
पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने मैफलीचा प्रारंभ झाला. वेदश्री यांनी संगीत सौभद्र नाटकातील ‘चालताना पदर झाडी, नेसली पितांबर जरी गं, जरतारी लाल साडी` हे नाट्यपद सादर केले. निवेदिका दीप्ती भागवत यांनी बालगंधर्वांच्या आठवणी जागवल्या. ‘वद जावू कुणाला शरणं गं, करील जो मरणं संकटाचे, मी धरीन चरण त्याचे` या नाट्यपदांनी मैफलीत रंग भरण्यास प्रारंभ केला. संगीत मत्स्यगंधा नाटकातील ‘गुंतता ह्रदय हे… कमलदलाच्या पाशी`, ‘हा प्रणयगंध परीमळे तुझ्या अंगाशी, या इथे जाहला संगम दोन सरितांचा, प्राक्तनीया अपुल्या योग इथे प्रितिचा…` या नाट्यपदाला श्रीरंग यांनी स्वरांचा साज चढवला.
पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने अजरामर झालेले संगीत मानापमान नाटकातील चंद्रिका ही जणू हे नाट्यपद धनंजय यांनी पेश केले. तब्बल 40 संगीत नाटके मुखोद्गत असलेले ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांनी ऑर्गनवर ‘चंद्रिका ही जणू`, नाट्यपद पुन:श्च सादर केले. या वेळी त्यांनी संगीत नाटक करतानाचे काही किस्से श्रोत्यांना सांगितले. मैफलीचे शिर्षक असलेले मर्मबंधातली ठेव ही, प्रेममय ठेवी जपूनी, सुखाने दुखवी जीव`, या नाट्यपदानंतर मैफल अधिकच रंगतदार झाली. कुलवधू नाटकातील किती तरी आतूर प्रेम आपुले, मानिती सारे नाट्यपदानंतर खट्याल वल्लरीची मस्करी असलेले संगीत शारदा नाटकातील म्हातारा इतुका अघवे पाऊणशे वयोमान, लग्ना अजुनी लहान, या अल्लड नाट्यपदाने लहानथोरांना आनंदानुभूती दिली.
पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने मैफलीचा प्रारंभ झाला. वेदश्री यांनी संगीत सौभद्र नाटकातील ‘चालताना पदर झाडी, नेसली पितांबर जरी गं, जरतारी लाल साडी` हे नाट्यपद सादर केले. निवेदिका दीप्ती भागवत यांनी बालगंधर्वांच्या आठवणी जागवल्या. ‘वद जावू कुणाला शरणं गं, करील जो मरणं संकटाचे, मी धरीन चरण त्याचे` या नाट्यपदांनी मैफलीत रंग भरण्यास प्रारंभ केला. संगीत मत्स्यगंधा नाटकातील ‘गुंतता ह्रदय हे… कमलदलाच्या पाशी`, ‘हा प्रणयगंध परीमळे तुझ्या अंगाशी, या इथे जाहला संगम दोन सरितांचा, प्राक्तनीया अपुल्या योग इथे प्रितिचा…` या नाट्यपदाला श्रीरंग यांनी स्वरांचा साज चढवला. पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने अजरामर झालेले संगीत मानापमान नाटकातील चंद्रिका ही जणू हे नाट्यपद धनंजय यांनी पेश केले. तब्बल 40 संगीत नाटके मुखोद्गत असलेले ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांनी ऑर्गनवर ‘चंद्रिका ही जणू`, नाट्यपद पुन:श्च सादर केले. या वेळी त्यांनी संगित नाटक करतानाचे काही किस्से श्रोत्यांना सांगितले. मैफलीचे शिर्षक असलेले मर्मबंधातली ठेव ही, प्रेममय ठेवी जपूनी, सुखाने दुखवी जीव`, या नाट्यपदानंतर मैफल अधिकच रंगतदार झाली. कुलवधू नाटकातील किती तरी आतूर प्रेम आपुले, मानिती सारे नाट्यपदानंतर खट्याल वल्लरीची मस्करी असलेले संगीत शारदा नाटकातील म्हातारा इतुका अघवे पाऊणशे वयोमान, लग्ना अजुनी लहान, या अल्लड नाट्यपदाने लहानथोरांना आनंदानुभूती दिली.
‘सूरत पिया की बिसराई…`ने समारोप
‘हे सुरांनो चंद्र व्हा, चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहोचवा`, या ययाती व देवयानी नाटकातील पदाचे वेदश्री सुमधूर सादरीकरणाला रसिकांची मनमुराद दाद मिळाली. ‘बसंत की बहार आयी`नंतर कट्यार काळजात घुसली नाटकातील ‘तीन गुंफलेली घेई चंद मकरंद, मुरलीधर श्याम हे नंदलाल` व ‘सूरत पिया की बिसराई जोहार मायबाप जोहार` या नाट्यपदाने मैफलीच्या उत्तरार्धात सादरीकरण करण्यात आले. भैरवीने मैफलीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान निवेदिका दीप्ती भागवत यांनी रंगभूमीचे मनोगत सादर केले.