एकूण पाच जणांवर झाला गुन्हा दाखल
नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे इतर काही नेते कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा करीत आहे . नाशिक येथील बिटको रुग्णालयात पाहणी दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले असता त्यांच्यावर काही तरुणांनी अश्लाघ्य भाषेत टीका टिप्पणी केली आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पदाधिकारी दिसून येत आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली याप्रकरणी नाशिक येथे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 30 एप्रिल रोजी नाशिक येथील बिटको रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला देवेंद्र फडणवीस रुग्णालयात प्रवेश करत असताना काही तरुणांनी शिवराळ डिचवण्याचा भाषे प्रयत्न केला असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणा मध्ये दिसून येते.