पारोळा-प्रतिनिधी
अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकर संक्रांतीच्या सणा निमित्त पारोळा बाजारपेठेत तिळगुळ विक्रीस दाखल झालेले आहे, मागील दोन वर्षापासून मकर संक्रांतीच्या सणावर कोरोना मुळे संक्रात आल्याचे दिसत आहे, यावर्षी ही मकर संक्रातीच्या जवळपासच कोरोनाने डोके वर काढले आहे, मकर संक्रांतीचा सण कुठे पतंग उडवून तर कुठे तिळगुळ वाटप करून साजरा करण्यात येत असतो खान्देशात या सणाच्या दिवशी एकमेकांना तीळ-गूळ वाटून आपसातील कटू पणा दूर करावा व सदैव आपण एकमेकांशी गोड राहावे अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात, म्हणून या सणाला खान्देशात मोठे महत्त्व आहे, या दिवशी लहान-मोठे एकमेकांना तीळ-गूळ वाटून तसेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे सांगून एकमेकांप्रती आदर व्यक्त करीत असतात व एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे तसेच निर्बंध असल्याने हा सण फारच कमी प्रमाणात साजरा करण्यात येत असल्याचे जाणवत आहे। मागील पंधरा ते वीस वर्षांपासून तिळगुळ विक्रीचा व्यवसाय करीत आहे परंतु मागील तीन वर्षापासून तिळगुळाच्या या व्यवसायात मला नफा कमी आणि नुकसान जास्त झाले आहे,अशी खंत या विक्रेत्याने व्यक्त केली, आधी अनेक लोक तिळगुळ घेण्यासाठी येत असत परंतु कोरोना मुळे अनेकांनी या सणाकडे पाठ फिरवली आहे म्हणून आमच्या व्यवसायावरही याचा परिणाम झालेला आहे,