कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी)
एरंडोल : – तालुक्यातील आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील विदयार्थांना को व्हॅक्सीन डोस देण्यात आली . गावात एकूण ३९१ लसीचे डोस उपलब्ध झाली आहे . शाळेतील एकूण २०० विद्यार्थी पैकी १४० विद्यार्थांनी लसीकरण केले . यावेळी तालुका गट विकास अधिकारी अकलाडे यांनी भेट देऊन कोरोना संदर्भातील सुचना केल्या . तालुका आरोग्य अधिकारी डॉ . फिरोज शेख यांनी कोरोनाचा प्रभाव जरी वाढला असला तरी स्वतः काळजी घेणे महत्वाचे आहे . मास्क , सॅनिटायझर, तसेच गर्दी टाळण्याचे आहावान त्यांनी केले . शासनाच्या सुचनांचे पालन करावे . लवकरच बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात येणार आहे . बुस्टर डोस ज्यांना दोन लसीकरण होऊन ९ महिने झाले असतील त्यांना बुस्टर डोस देण्यात येईल असे डॉ शेख यांनी सांगितले . यावेळी शाळेचे कार्यध्यक्ष भगतसिंग पाटील शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर , शिवदास राठोड , राजेश गोसावी तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते . आरोग्य सेविका निर्मला गढरी यांनी विदयार्थiना लसीकरण केले . त्यांना डाटा ऑफरेटर निलेश जमादार , आशा सेविका कल्पना तागड , सुनिता पाटील , पल्लवी पाटील , वैशाली पाटील , रंजना पाटील , आदि लसीकरणासाठी सहकार्य केले .