जळगाव राजमुद्रा दर्पण | मागील वर्षी जानेवारीत2021 रोजी असोदा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून एकच उमेदवार दोन ठिकाणी निवडून आल्याने या जागेसाठी आज दि 18 रोजी सर्वसाधारण स्त्री राखीव मतदारसंघातुन सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे पार पडले असून संपूर्ण वार्ड क्र 4 चे मतदान 1550 पैकी 1088 इतके झाल्याचा अंदाज आहे.
गावाच्या विकासासाठी अपक्ष उमेदवाराचा पुढाकार
उमेदवार सौ सुनिता वसंत चौधरी यांनी एका जागेसाठी अधिक अर्ज आल्यामुळे आपण गावाच्या विकासासाठी व एकात्मते साठी प्रचार न व मतदान केंद्रस्थळी न जाता आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. रोड रोलर सौ सुनीता चौधरी यांची निशाणी असून गावातील एकत्रीकरणा त्यांनी पुढाकार घेतला आहे.
मात्र सदर मतदान केंद्रावर स्थळी दिवसभर शांततेत मतदान पार पडले असून तालुका पोलीस स्टेशन यांचा दिवसभर मोठा फौज फाटा तैनात होता. परंतु मतमोजणी उद्या वर होणार असल्याने ग्रामस्थांना मात्र निकालाची उत्सुकता लागून आहे