कवठेमहांकाळ | राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र असलेले रोहित पाटील यांना कवठेमहाकाळ नगरपंचायत प्रचंड यश मिळाल्याने संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे राज्यभरातून त्यांना पक्षातून देखील शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. कवठेमहाकाळ निवडणुकीमध्ये मैदानात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना रोहित पाटील यांनी केलेले विधान सतत उतरलेला आहे. विरोधकांवर टीका रोहित पवार यांनी केलेली टिक्का अधिक चर्चेत आली आहे. निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा त्याला बाबा पाठवला असा टोला लगावला होता निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा “त्यांना विरोधकांना माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही” असे विधान रोहित पाटील यांनी केले होते. अखेर कवठेमहाकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांनी विजया चा झेंडा रोवला आहे. त्यांच्या या विजयाने आगामी राजकारणातील युवकांचे काय स्थान असणार हे दर्शवणारे ठरले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कवठेमहाकाळ नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू असताना रोहित पाटील विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत रंगली होती सगळेच पक्ष रोहित पाटील यांच्या विरोधात जोरदार प्रचार करीत होते मात्र असे असतांना रोहित पाटील यांनी न डगमगता आर आर आबांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकांमध्ये जात विश्वास सार्थ विकासाचा अजेंडा सादर करीत जनतेला भावेल असे वातावरण निर्माण केले यामुळे रोहित पाटलांचा एक हाती विजय झाला आहे.