मुंबई राजमुद्रा दर्पण |गेल्या 26 महिन्यापासून सत्तेच्या बाहेर असून मद्रास झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी नव्हे तर राज्यात आम्हीच नंबर वन आहोत असे सिद्ध झाले आहे असे शब्दातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डीचवले आहे. राज्यामध्ये नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहे. राज्यात आम्ही नंबर वन असल्याचा दावा केला जात आहे मात्र निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात अधिकृत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही मात्र आज लागलेल्या निकालावरून भाजपने तर्क लावल्याचे दिसून आले.
गेले सव्वीस महिने भाजपा राज्यात सत्तेवर नाही, तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपचे नेते कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे, त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे समन्वय नाही कोरोना चा सामना करणे आणि राज्यात विकास कामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाई मध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे म्हणून आजचा निकाल जनतेने आमच्या बाजूने लावला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला चिमटे काढले आहे. राज्यातील नगरपालिका नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळवल्या असून पुन्हा एकदा भाजपाच राज्यात नर नंबर वन असल्याचं सिद्ध झाले आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे
भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरवल्या बद्दल जनतेचे आभार यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मानले. तसेच कार्यकर्ते देखील आभार मानले आहे. भाजपला या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काहीची यांची मदत घेऊन 34 नगरपालिका नगरपंचायती मध्ये भाजपची सत्ता असेल असं वक्तव्य देखील पाटील यांनी केले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल असे देखील पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.