जळगाव राजमुद्रा दर्पण |
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या शिष्ट मंडळाने सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगांव यांची भेट घेऊन उत्तर महाराष्ट्र परिसरातील तिन्ही जिल्ह्यातील विद्यापीठ व महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या हजारो CHB च्या शिक्षक, प्राध्यापक यांच्या दरमाह मानधन मिळावे, या साठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने दि.१४/११/२०१८ आणि दि. २२/१०/२०२१ रोजी शासन निर्णय काढून CHB वर काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांसाठी नियम व अटी लागू केलेल्या आहेत. परंतु, त्यातील बऱ्याच तरतुदी महाविद्यालये, विद्यापीठ आणि सहसंचालक अंमलात आणत नसल्याचे दिसते. त्यासाठी संचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांनी दि. ०६/०१/२०२२ रोजी सर्व सहसंचालकांना उद्देशून परिपत्रक काढून शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोर पालन करून सर्व महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर (CHB) कार्यरत असणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांचे वेतन दरमहा सेवार्थ/एचटीई प्रणाली द्वारे करावे, असे आदेशित केले. तरीही १२ दिवस उलटूनही कोणतेही परिपत्रक किंवा अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यावर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आज मासूच्या शिष्ट मंडळाने डॉ. संतोष चव्हाण, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगांव यांना नि
वेदन देऊन भेट घेतली.
भेटीदरम्यान शिष्यवृत्ती योजना बाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही विद्यार्थ्यांपर्यंत हया योजना पोचत नाहीत, अशी खेदजनक माहिती सहसंचालकांनी दिली. त्यासाठी, मासू सारख्या विद्यार्थी संघटना पुढे आल्यातर हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त केली व CHB च्या शिक्षकांच्या वेतन प्रक्रियेबाबत आजच परिपत्रक काढून संबंधितांना पाठवितो, असेही आश्र्वासित केलं. याप्रसंगी शिष्यवृत्ती बाबत काही अडचणी आल्यास माझ्यासह, श राम राठोड यांच्या कडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल; असे आश्वासन देण्यात आले. निवेदन देण्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन यांच्या सह पवन पाटील,श्रेयस चौधरी, भावेश पाट
ील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.