बोदवड राजमुद्रा दर्पण | बिलाडी दिवसापासून राज्यभरात चर्चेला आलेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत दिग्गजांची परिषद प्रतिष्ठा पणाला लागली असताना पहिल्यांदाच मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने बोदवड नगरपंचायत लढवली होती यामध्ये होम पीच असतानादेखील पाहिजे तितका राष्ट्रवादीला खडसे यांच्या नेतृत्वात मिळवता आलेले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक घटना घडल्या आहेत या घटनादेखील राज्यभरात चर्चेला आल्या यामधील महत्त्वाचं म्हणजे खडसे यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन रोहिनी खडसे यांच्या वाहनावर जीवघेणा हल्ला यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे यातूनच परस्परांविरुद्ध देखील पोलिसात दाखल तक्रारी यामुळे ही निवडणूक पक्षीय राजकारणाच्या पलीकडे व्यक्तिगत संघर्षाची आग लावणारी ठरली आहे.
ही निवडणूक राष्ट्रवादी अथवा शिवसेना या राजकीय पक्षाची कधीच नव्हती अथवा पुढे ही असणार नाही मात्र ही निवडणूक खडसे विरुद्ध पाटील अशीच रंगताना दिसून आली. नेहमी जिल्ह्यात किंगमेकर ची भूमिका निभावणारे माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा करिश्मा तापी खोऱ्यात चालणार नाही हा राजकीय अंदाज काहींच्या मते खरा ठरला आहे. ईश्वर चिट्टी च्या भोरोवशावर भाजपची एक जागा हाती लागली मात्र खूप काही महाजन यांच्या नेतृत्वात भाजपला करता आलेले नाही. ह्या लढाईत मुळात कोणताच राजकीय पक्ष नव्हता ही निवडणूक खडसे विरुद्ध पाटील यांची व्यक्तिगत पातळीवरील लढाई मानली जात आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे प्रथमच मुक्ताईनगर या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून खडसे विरुद्ध पाटील असा संघर्ष पेटलेला दिसून येत आहे. यापूर्वी अनेक वादाचे प्रसंग खडसे व पाटील यांमध्ये दिसून आले यामुळे दोघांच्या समर्थकांमध्ये देखील तुरळक वादाचे प्रसंग उदभवले आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकी दरम्यान खडसे व पाटील समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकले गेले होते यातून राजकीय वादाला अधिक फोडणी मिळाली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या पूर्वी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. यापूर्वी ते कट्टर खडसे समर्थक मानले जात होते. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले चंद्रकांत पाटील हे देखील कंबर कसून होते.शिवसेनकडून चंद्रकांत पाटील यांनी देखील खडसेंविरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना पराभूत देखील व्हावे लागले मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ मिळाल्याने त्यांनी खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना पराभूत करत विजयीश्री खेचली यामुळे खडसेंचा पराभव केला म्हणून ते अधिक चर्चेत आले.
मात्र विधानसभे नंतर त्यांनी आपली ताकत दाखवायला सुरुवात केली, नरपंचायत व नगरपालिका निवडणुकीच्या आधीच त्यांनी कट्टर खडसे समर्थक असलेले भाजपच्या नगराध्यक्षसह नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वात मुंबई येथे प्रवेश करून घेतला यावेळी खडसेंना हा मोठा धक्का मानला जात होता यामुळे विजयी श्री खेचून आणणारे उमेदवारांना थेट शिवसेनेत आणत त्यांनी आधीच विजय प्राप्त करून घेतला शिवसेनेत त्यांच्या नेतृत्वात मिळालेले यश त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. आगामी काळात जिल्ह्याचे राजकारण कोणत्या वळणार चालेल ते या निकालावरून काही प्रमाणात स्पष्ट होते.