जामनेर राजमुद्रा दर्पण :- शहरातील पाचोरा रोडवरील आयडीआय बँक शाखेच्या एटीएममधील १३ लाख रूपयांच्यावर रकमेवर चोरट्यांनी हात साफ करीत जबरी दरोडा टाकला.चोरट्यांनी एटीएम दालनात जायच्या अगोदर सिसीटिव्हि कँमेराचे एटीएमकडची दिशा बदलुन व आपातकालीन ध्वनी क्षेपकाची जोडणी अगोदर तोडुन आत प्रवेश केला व गँस कटरच्या सह्हायाने एटीएम मशीनचा पत्रा कापला त्यातील १३ लाख ७८००० रूपयांच्या रक्कमेवर हात साफ करीत दरोडा टाकुन पसार झाले. चोरटे कोणत्या वाहनाने कुठुन आले व किती जण होते याबाबत पोलीस प्रशासनाकडुन तपासात समोर येईल.एवढी मोठी रक्कम एटीएममध्ये असल्याची माहिती चोरट्यांना अगोदरच असल्याची शंका व्यक्त होत असुन किंवा चोरट्यांनी एटीएममध्ये रक्कम टाकत असताना पाळत ठेवली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जावुन पाहणी केली.जामनेर पोलिस ठाण्यात शाखा व्यवस्थापक प्रसून परेश घोष यांच्या फिर्यादीवरून कलम ३८०,४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपासपोलीस निरिक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.