जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |दि. २६जाने.२०२२ :- कोविड १९ च्या शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत वरगव्हाण गावात भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत वरगव्हाण येथे ग्रामपंचायत सदस्य श्री. जहांगीर तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जि. प.प्रा.शाळा, वरगव्हाण येथे CISF जवान श्री. शरीफ तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी शाळेची कमानीसाठी सरपंच श्री. भुषणदादा पाटील यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार शा. व्या. समिती अध्यक्षा श्रीम. हाफिजा निसार तडवी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेसाठी पाण्याची टाकी देणारे दाते श्री. विकास हिरामण पाटील यांचा देखिल सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. कोविड योध्दा म्हणून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायती चे कर्मचारी यांचा सत्कार सरपंच श्री. भुषणदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शाळा विकासास हातभार लावणारे श्री. लतीब तडवी, श्री. मुजात तडवी, श्री. धर्मा पावरा, श्री. भगवान अढाळके, श्री. संदीप पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच श्री. भुषणदादा पाटील,गावाचे पोलिस पाटील श्री. गोरख नाना पाटील, श्री. नेमीचंद आप्पा सोनार,श्री.जयसिंग तात्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. रविंद्र पाटील, श्री. जहांगीर तडवी, श्री. जावेद तडवी, श्री. प्रताप बारेला, श्रीम.इंद्रायणी पाटील ,श्रीम. सायराबाई पावरा, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. हाफिजा तडवी व सर्व सदस्य, ग्रामसेवक श्री. विजय सोनार , सामाजिक कार्यकर्ते श्री. महेंद्र पाटील,श्री. हैदर तडवी, श्री. दिनेश सोनार, श्री. गजानन पाटील, श्री. मस्जिद तडवी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मंगला पाटील, श्रीम. आशा सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरीफ तडवी सर यांनी केले व आभार श्री. राकेश पाटील सर यांनी मानले.