जामनेर राजमुद्रा दर्पण :- महाविकास आघाडीतील खेळखंडोबा मुळे शेतकरी सह नागरिक त्रस्त असून मेटाकुटीस आलेले आहे.विज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने शेतकरी यांना फार मोठे नुकसान सोसावे लागत आहे या नुकसानीमुळे शेतकरी यांना मरणाच्या खाईत हे सरकार ढकलत आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे तिन तोंडाचे सरकार असून गांधीजींचे तीन माकड या प्रमाणे आहे मात्र प्रत्येकाचे तोंड विरुध्द दिशेला आहे.मंत्र्यामध्ये एक विचार नाही निर्णय घ्यायची क्षमता नाही .प्रत्येकात चलबिचल अवस्था आहे. यामुळे मात्र शेतकरी,सर्व सामान्य नागरिक होरपळत आहे.विहीरीत पाणी असतांना ही विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी त्यांना देता येत नसल्याची अवस्थता आहे. रोहित्र जळाली की महिनें महिने मिळत नाही.वीज जोडणीसाठी वर्ष वर्षभर थांबावे लागत आहे. वीज वापर नसताना भरमसाठ विजदेयक दिले जात असून सक्तीची विजवसुली केली जात आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सरकारमध्ये पाच वर्ष एकदाही लोडशेडिंग झाले नाही.रोहित्र जळाले की अर्ध्या तासाच्या आत रोहित्र उपलब्ध करून देत होतो.शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करून शेतकरी आपले उत्पन्न काढत होते. मात्र या आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी देशोधडीला लागला आहे.
शेतकरी मरणा अवस्थेत आला असुन यामुळे आज भाजपाकडून आंदोलन केले जात आहे .
सततच्या विज खंडीत होत असल्या कारणाने शेतकरी यांच्या पुढे आत्महत्या करण्याची पाळी येवून ठेपली आहे .
विजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा अन्यथा शेतकरी यांचे मोठे आंदोलन तालुक्यात ,जिल्ह्यात ,
राज्यभर भाजपातर्फे उभारू या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार होरपळून निघेल असा इशारा आ गिरीश महाजन यांनी दिला मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर, गोविंद अग्रवाल, चंद्रकांत बाविस्कर,महेंद्र बावस्कर, प्राध्यापक शरद पाटील, बाबुराव घोंगडे यांनी मार्गदर्शन केले.
या आंदोलनात शेतकरी बांधवानी बैलगाडी सह उपस्थिती दर्शवली होती जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा यांच्यासह महिला मोर्चात सहभागी होत्या.जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समिती सभापती सदस्य नगरपालिकेचे गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच जामनेर तालुक्यातील शेतकरी यांच्या सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक किरण शिंदे, प्रताप इंगळे यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.